चहाच्या टपरीस लागली आग…. -सुदैवाने जीवीत हानी टळली… पाचोरा शहरातील घटना
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर गॅसचा भडका उडुन आग लागली. या आगीत एक इसम भाजला गेला. वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील होणारा अनर्थ टळला.शहरातील देशमुखवाडी कडे जाणाऱ्या राजेंद्र प्रसाद रोडवर देशमुख वाडी येथील वृद्ध महिला दगुबाई विठ्ठल महाजन (वय – ७० वर्षे) ह्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रकाश टाॅकीज् समोर चहाची टपरी चालवतात. ७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान गॅस सिलिंडर लावण्यासाठी समोरच राहणाऱ्या दिपक चतुर्भुज शर्मा यांना आवाज देवुन दगुबाई यांनी बोलावुन घेतले. दरम्यान दिपक शर्मा हे गॅस सिलिंडर लावत असतानाच अचानक भडका झाला. व आग लागली घटनास्थळावरुन दगुबाई महाजन ह्या दुर झाल्या मात्र दिपक शर्मा यांचा डाव्या हात व गाल भाजला गेला. उपस्थितांच्या मदतीने तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी घटनास्थळा जवळ सिनेमा थिएटर, दुकाने असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत वृद्ध महिलेची चहाची टपरी मात्र जळुन खाक झाली आहे.