पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लाॅयर्स असोशीएशन तर्फे न्यायालयात शिवजन्मोत्सव साजरा

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा प्रतिनिधी –
दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे पाचोरा दिवाणी न्यायालयात छत्रपती शिवाजी राजांचा जन्मोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला. या वकील असोसिएशनने न्यायालयात प्रथमच छ. शिवाजी महाराजांचा जयंती साजरी करून नवीन पायंडा पाडल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या महोत्सवाचे अध्यक्ष ॲड .एस. पी. पाटील होते. वकील दालनात छ. शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व वकील बांधवांनी महाराजांना अभिवादन केले. या प्रसंगी ॲड. अनिल पाटील, ॲड. अण्णासाहेब देशमुख, पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अभय पाटील यांनी शिवरायांच्या अफाट गुण कौशल्याचे वर्णन आणि त्यांच्या आदर्श जीवनाच्या शिकवणीवर वाटचाल करण्याचे मनोगत व्यक्त केले.तसेच चिमुकला नक्षत्र प्रशांत येवले इंग्रजीतून आपले विचार मांडले.
उपस्थित वकील बांधवांना शिवबा मेडिकल स्टोअर्स पाचोरा यांच्यातर्फे शिवप्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोप नंतर सर्व वकील बांधवांनी न्यायालय ते छ. शिवाजी महाराज चौका पर्यंत मोटरसायकलवर रॅली काढत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले.

पाचोरा न्यायालयात प्रथमच शिवजयंती साजरी

पाचोरा न्यायालयात स्थापनेपासून आतापर्यंत छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात नव्हती. त्याची सुरुवात पाचोरा न्यायालयात दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व वकील बांधवांनी एकत्र येऊन केली. या अभिनव उपक्रमांत सर्वांचाच वाटा असून जन्मोत्सव यशस्वीतेसाठी अॅड.अंकुश कटारे, अॅड बबलु पठाण , अॅड ज्ञानेश्वर लोहार, अॅड. रविद्र ब्राम्हणे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाला अॅड.रणसिग राजपुत, अॅड. बापु सैदाणे, अॅड.रवी राजपुत, अॅड.दिपक पाटील,अॅड. प्रशांत नागणे,अॅड.कैलास सोनवणे,अॅड.सचिन देशपांडे, अॅड. मानसिगं सिध्दु,अॅड. स्वप्निल पाटील,अॅड. रोशन, अॅड.राजेंद्र परदेशी,अॅड गोपाल पाटील ,अॅड पी.डी.पाटील, अॅड. कालीदास गीरी अॅड. अविनाश सुतार अॅड. ललित सुतार अॅड. सायली अॅड. राजु वासवानी, न्यायालयातील दिपक तायडे याच्यासह ईतर वकील आणि ज्येष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी, अनिल येवले, योगेश पाटील, प्रशांत येवले, राजेंद्र खैरनार उपस्थित होते.या महोत्सवाल कलाशिक्षक सुवर्णा पाटील यांनि सुंदर रांगोळी सजावट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.भाग्यश्री पाटील तर आभार सचिव अॅड. सुनील सोनवणे यांनी मानले.

Related Articles

Back to top button