वादळात आमदारकी उडाली आता स्फोटात कारखाना जाणा- पार्ले येथे आमदार मनोज घोरपडे यांची चपराक
कराड : विद्या मोरे
सह्याद्री साखर कारखान्याचे एक्सपान्शनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. कामाचा कोणताही अनुभव नाही अशा कंपनीला हे काम दिले असून वादळाने लोखंडी खांब, सिमेंटचे फुटींग उडून गेल्याचे सांगतात. खरतर वादळात यांची आमदार गेली आणि आता घाईगडबडीत ईएसपी बाॅयलरचा स्फोट झाला या स्फोटात यांच्याकडून कारखानाही जाणार अशी चपराक आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. सह्याद्रीत पारदर्शकता आणण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलला साथ देण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
पार्ले ता. कराड येथे सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पै. संतोष वेताळ, विनायक भोसले, राहुल पाटील, मोहन पवार, विलास करांडे, तानाजी नलवडे, आत्माराम माने तसेच उमेदवार, सह्याद्री कारखान्याचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सह्याद्री कारखान्याची निवडणूक दुरंगी होण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले पंरतु काहींची भुमिका वेगळी होती परंतु दोन तुल्यबळ पॅनेल असल्याने तिसऱ्याचा कुणीही विचार करणार नाही. २५ वर्षात सभासदांच्या हिताचा कुठलाही निर्णय कारखान्यातून घेता आला नाही. संस्थापकांच्या घरातीलही वारस नोंदी जाणिवपूर्वक टाळल्या. सभासदांनी लवकर तोड येत नाही म्हणून अन्यत्र ऊस घालवले अशा सभासदांचे माफीनामे लिहून घेवून त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न झाला. ऊस नोंदीच्या बाबतीत पारदर्शकता नसल्याने सभासदांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात स्व यशवंत चव्हाण पॅनेलच्या माध्यमातून कारखाण्याची सभासद, कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. यावेळी पै. संतोष वेताळ, विनायक भोसले, राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
*कराड उत्तर मधील पाणी प्रश्नावर भरीव काम*
कराड उत्तर मतदारसंघांतील पाणी प्रश्न सोडवणे हा माझा अजेंडा असून पाल इंदोली उपसा सिंचन योजनेला 100 मीटर हेडची मान्यता आणली आहे. हणबरवाडी धनगरवाडी योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होईल. 25 वर्षात माजी आमदारांना जे जमले नाही ते साडेतीन महिन्यात करून दाखवले. कराड तालुक्यासह कारखाना कार्यक्षेत्रात शेतीला मुबलक पाणी मिळाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढून कारखान्याचे अधिकचे गाळप वाढण्यासही मदत होईल असे आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले.