पत्नीच्या अश्लील शिवीगाळीला कंटाळून तलाठ्याची फाशी घेत आत्महत्या
राहुल खंडेराव (अकोट महाराष्ट्र )
तेल्हारा : तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असलेला शिलानंद माणिकराव तेलगोटे वय ३९ वर्षे हा तेल्हारा शहरातील शाहूनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होता.आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान त्याने शेगाव रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे एमआयडीसी परिसरात पत्नीच्या त्रासापायी कंटाळून तिच्याच नावाने व्हॉट्स अँपला स्टेट्स ठेवून फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.
पत्नी मुलांसमोर अश्लील शिवीगाळ करून सतत फाशी घे असे म्हणत असल्याचे त्याने ह्या मृत्यूपूर्व स्टेट्स वर नमूद करून ठेवले आहे.पत्नीच्या भावाला प्रवीण गायगोले ह्याला शेती घेण्यासाठी व्याजाने पैसे काढून दिलेत परंतु तो ते परत करीत नसल्याने त्याचे व्याज व मुद्दल रक्कम त्याच्या पगारातून कपात होत असल्याचाही उल्लेख ह्या स्टेट्स वर करण्यात आला आहे.
फाशी घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या स्टेट्स वर गेल्या पाच दिवसांपासून जेवण सुद्धा केले नसल्याचे सांगत त्याचा चेहरा पत्नीला दाखविण्यात येऊ नये असेही नमूद केले आहे.
तेल्हारा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे