सभासदांच्या कडून माफीनामा घेतला. तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार

आमदार मनोजदादा घोरपडे

कराड : विद्या मोरे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घातला म्हणून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. मालकाकडून विश्वस्तानी माफीनामा लिहून घेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल त्यामुळे सभासद यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज दादा घोरपडे यांनी केले. सह्याद्री कारखान्याची निवडणूक दुरंगी होण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले पंरतु काहींची भुमिका वेगळी होती. आजवर तिरंगी लढतीचा फायदा ते आमदार होते त्यामुळे त्यांना झाला. आता मी आमदार आहे त्यामुळे तिरंगीचा फायदा आम्हाला होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सताधाऱ्यांना मदत होईल अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचार बैठकीत शिरवडे ता. कराड येथे ते बोलत होते. यावेळी पै. संतोष वेताळ, राजेंद्र पाटील, सर्जेराव थोरात, दिनकर पाटील, राजेंद्र जगदाळे, कृष्णत थोरात, अनिलराव डुबल, पै. नयन निकम, भावड्या बोराटे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार घोरपडे म्हणाले, विधानसभेत पराभव झाल्यानेच
सभासदांना साखर फुकट देण्याचा निर्णय झाला. कामगारांना अमिषे दाखवली. पंरतु हे निवडणुकीचे गाजर आहे. कारखान्यातील परिपूर्णता आम्हीच करणार असून पात्र कामगारांना शंभर टक्के परमनंट करणार आहे. कामगारांचे हित जपण्यासाठी काम केले जाईल. आज कारखान्याच्या खोल्यांचे भाडे खाल्ले जाते, कार्यक्रमात लावलेल्या मंडपात ही कमिशन खाल्ले जाते हा चिंधी चोरीचा प्रकार असल्याचा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला.सह्याद्री कारखान्याच्या सभासदांकडून माफीनामा लिहून घेतला हा अधिकार त्यांना दिला कुणी? मी कारखान्याचा मालक व सगळेजण माझे गुलाम आहेत अशा आविर्भावात ते आहेत. आज कारखान्याचे एक्सपान्शन होत असताना चुकीच्या कंपनीला ऑर्डर दिल्याने तीन वर्षांपासून हे काम रेंगाळले. कारखान्याची निवडणूक लागल्यामुळे एक्सपान्शन चे काम पूर्ण झालेले आहे हे दाखवण्याच्या घाईगडबडीत कारखान्याचा ईएसपी बॉयलर फुटला, पूर्वी कारखान्यात वादळ झाले त्यात यांची आमदारकी गेले आता ईएसपी बॉयलर फुटला यामध्ये कारखान्याची सत्ता जाणार असा टोला आमदार घोरपडे यांनी लगावला. आजवर सभासदांच्या हिताचा कुठलाही निर्णय कारखान्यातून झाला नाही. जाणिवपूर्वक वारस नोंदी टाळणे, माफीनामे लिहून घेवून भीती दाखवणे असे ना अनेक प्रकार झाले. नोंदीच्या बाबतीत पारदर्शकता नसल्याने सभासदांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात स्व यशवंत चव्हाण साहेब सहयाद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करुन देनारच असल्याचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी सांगितले.

विकासकामांसाठी 7.50 कोटींचा निधी मंजूर
अवघ्या साडेतीन महिन्यात कराड उत्तर मधील विकास कामांना गती देण्यासाठी यश आले असून कराड उत्तर मधील अनेक गावातील अंतर्गत विकास कामांसाठी 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित गावांना येणाऱ्या काळामध्ये निधी उपलब्ध करण्यात येईल. असे आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button