पाचोऱ्यात गायक कामराचा पुतळा दहन, कामरा वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Burning effigy of singer Kamra in Pachoriyat. Demand to file a case against Kamara
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनीधी)-
पाचोरा – गायक कुणाल कामरा याने एका कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यातून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केली होती. त्यामुळे भावना दुखावलेल्या पाचोरा येथील शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी गायक कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला.
पाचोरा शहर, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन केले. दरम्यान कुणाल कामरा यांच्या टिपणीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय पाचोरा पोलिस ठाण्यात कुणाल कामरा यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार केली आहे. यावेळी माजी नगरसेवक गंगाराम पाटील, युवासेना शहर प्रमुख सुमित सावंत, सागर पाटील, संदीप राजेपाटील, अनिल पाटील, विजय भोई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.