आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ठिक ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन
MLA Dr. Planning of programs on the occasion of Atulbaba Bhosale's birthday
कराड : विद्या मोरे
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २८ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत कराड शहर व ग्रामीण भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २८) कोयना वसाहत (ता. कराड) येथील कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणावर शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी दुपारी ४.३० वाजता आ.डॉ. भोसले यांचे मुंबईहून कराड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, ते सायंकाळी ६ वाजलेपासून कृष्णा स्कूलच्या प्रांगणात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) कराड येथील रिमांड होम आणि कोळे येथील जिजाऊ अनाथाश्रम येथे फळे व खाऊवाटप केले जाणार आहे. शनिवारी (ता. २९) रेठरे बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्यावतीने सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ३१) सायंकाळी ८ वाजता कराड येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी वडगाव हवेली येथे भव्य बैलगाडी शर्यती, आगाशिवनगर-मलकापूर येथे सायंकाळी ६ वाजता खेळ पैठणीचा आणि वारुंजी येथे सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.
२ एप्रिल रोजी रेठरे बुद्रुक येथे शिवशक्ती क्रिकेट क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धा, तसेच पाचवड येथील श्री पाचवडेश्वर मंदिराजवळ भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. ३ एप्रिल रोजी विंग येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ४ एप्रिल रोजी विंग येथे सकाळी १० वाजता श्वान स्पर्धा, तर टाळगाव येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मनव येथे ५ एप्रिल रोजी भव्य धनगरी ढोल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कराडमध्ये अतुलपर्व कृष्णा महोत्सव
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील प्रीतिसंगम घाटावर ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान अतुलपर्व कृष्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिनेस्टार क्रांती (नाना) मळेगावकर यांचा होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा कार्यक्रम, ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘झी टीव्ही’ फेम शाहीर देवानंद माळी यांचा ‘शाहिरी गर्जना’ हा पोवाडा, भारुड, गोंधळ व लोकगीतांचा कार्यक्रम आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वरांजली’ हा जुन्या नव्या हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.