Akola:कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारक पदी मिलिंद नितोने यांची निवड
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
अकोट, २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारक पदी युवक कॉग्रेस चे माजी निरीक्षक मिलिंद नितोने यांची निवड हि अखिल भारतीय युवक कॉग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्हि. श्रीनिवास यांनि केली मिलिंद नितोने यांना याआधी सुद्धा राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र मधे धुळे, लातूर, नंदुरबार या लोकसभेचि तसेच विविध राज्यात काम करण्याची जवाबदारी देण्यात आली होती. तसेच या वेळी सुद्धा त्यांना परत कर्नाटक माधिल बेलगाम या लोकसभा मतदार संघाची जवाबदारी देण्यात आली. सदर निवडनुकिचे श्रेय अखिल भारतीय युवक कॉग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्हि. श्रीनिवास, अखिल भारतीय युवक कॉग्रेस चे राष्ट्रीय सचिव विनीत कम्बोज, अखिल भारतीय युवक कॉग्रेस चे राष्ट्रीय सचिव बंटी शेलके, अकोला जिल्हा कॉग्रेस कमिटी चे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश गणगणे, आदिंना मिलिंद नितोने देतात.