निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिलादिन साजरा
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. यानंतर सौ. अश्विनी झोडगेकर, सौ.रिना सोमवंशी, सौ. कल्याणी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात महिला शिक्षकांनी आपल्या नृत्याविष्कारातून स्त्री शक्ती, शिक्षण, आत्मनिर्भरता समाजातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला. या नाट्यपूर्ण सादरी करणातून संदेश दिला.शाळेचे अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून आजचा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देण्यासाठी आणि समानतेच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे. महिला दिन फक्त एक दिवसासाठी साजरा न करता महिलांचा सन्मान आणि समानता ही आपली रोजची जबाबदारी झाली पाहिजे या दिशेने आपण विचार करायला हवा. महिला म्हणजे केवळ कुटुंब व्यवस्थापन करणारी व्यक्ती नाही, तर त्या समाज, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, राजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असे मत व्यक्त केले आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय.बी.सिंग, प्राचार्य श्री.गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. जयश्री भोसले यांनी सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री बोरकर तर आभार सौ.अपेक्षा रंधावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.