सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कराड- पियुष गोर

आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,
यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी उमलत्या वयात मुलांना शालेय वास्तूतच भावी काळाची शिदोरी मिळते . मनाला आकार देणे ,विचारांना इष्ट वळण लावणं अन त्यानुसार अपेक्षित वर्तन बदल घडवून हे सांस्कृतिक कार्यक्रमातूनच नकळत साधते म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी यांनी जय मातादी कार्यालय विटा येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी विविध गुणदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे .या कार्यक्रमांमध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, फॅशन शो ,माईन, म्युझिकल ड्रामा, सोलो सिंगिंग , डुएट सिंगिंग यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण दर्शन करण्यासाठी मंच उपलब्ध झाला असुन या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका प्रेरणा शीदवाडकर व प्राध्यापिका हिरकणी पवार यांच्या नेतृत्वाखाली व कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर एन एस महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .या कार्यक्रमासाठी माननीय एडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील, माननीय एडवोकेट वैभव दादा पाटील ,माननीय पी.टी. पाटील कार्यकारी संचालक ,प्राध्यापिका पूजा पाटील कॅम्पस डायरेक्टर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Back to top button