कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड

The retirement of Dr. Neelam Mishra, Vice-Chancellor of Krishna Vishwa Vidyapeeth.

कराड : विद्या मोरे
दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती; मंगळवारी स्वीकारणार कार्यभार

कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी दिली. डॉ. मिश्रा यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाने कुलगुरु निवडीसाठी रितसर शोध समिती गठीत केली होती. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ॲन्ड बिलीरी सायन्सेसचे कुलगुरू डॉ. दीपक टेम्पे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य प्रा. ई. सुरेश कुमार आणि वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांचा समावेश होता.

या शोध समितीने ३ नावे निश्चित करुन, ती कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सोपविली. त्यातून कुलपती डॉ. भोसले यांनी डॉ. नीलम मिश्रा यांच्या नावाची निवड करत, त्यांची कुलगुरुपदी फेरनियुक्ती केली. २८ जानेवारीला त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला असून, मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी त्या सलग दुसऱ्यांदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नीलम मिश्रा यांना नियुक्ती आदेश प्रदान करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डावीकडून डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. श्रीनिवास बल्ली.

Related Articles

Back to top button