स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ ६ डिसेंबरपासून कराडला प्रदर्शन ; तयारीस वेग

कराड : विद्या मोरे

शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार आहे. यंदाचे १९ वर्ष असून, कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पाहता येणार आहे. या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ आज (मंगळवारी) सकाळी करण्यात आला. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे,बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे,राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड,संभाजी चव्हाण,सतीश इंगवले,विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, गणपत पाटील,प्रभारी सचिव आबासाहेब पाटील उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी संचालक जगन्नाथ लावंड यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरवलेले देशातील हे एकमेव प्रदर्शन असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लागणारे ज्ञान यामधून मिळणार आहे.दरवर्षी २४ नोव्हेंबर यादिवशी प्रदर्शन भरते. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या ६ डिसेंबर ते १० डिसेंबरअखेर हे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनात कृषी व औद्योगिक स्तरातील विविध बाबी तसेच खास आकर्षण पहायला मिळणार आहे.याकामी शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व आत्मा विभाग आदींचे मोठे सहकार्य लाभले आहे. मंडपाचे भूमिपूजन झाल्यानंतर अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती तत्पर आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ही संस्था कार्यरत आहे. प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे, हा उद्देश यामागे आहे. यावर्षी ३५० ते ४०० स्टॉल सहभागी होणार आहेत.यावेळी , हणमंतराव चव्हाण, आप्पासाहेब गरुड, बाबूराव धोकटे, संपतराव इंगवले, प्रा.ल धनाजी काटकर, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जे. डी. मोरे, कोयना सहकारी दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, माजी उपसभापती अशोकराव पाटील – पोतलेकर, सर्व माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पैलवान नानासाहेब पाटील, डॉ. सुधीर जगताप, संदीप शिंदे यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button