अकोलखेड व पणज महसुल मंडळातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाची अद्यापही मदत नाही शेतकऱ्यांनी केले एकदिवसीय धरने आंदोलन…

रिपोर्ट:अकोला से मोहम्मद जुनेद

Akola:अकोट तालुक्यातील अकोलखेड व पणज मंडळात ढगफुटी,सततचा परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे तसेच फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अकोट तालुक्यातील अकोलखेड व पणज महसूल मंडळात ढगफुटी तसेच परतीच्या पावसामुळे शेती खरडून गेली होती.या नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपयांची मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतापला असून नाराजी व्यक्त होत आहे.या मंडळातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल,असा प्रश्‍नही विचारल्या जात आहे.अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती.या ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी शेतातील पिकांचे नुकसान झाले,नदी-नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतात शिरले व पिकासह शेती खरडून गेल्याने मंडळातील अनेक गावांना त्याचा फटका बसला होता.तहसीलदारांच्या आदेशनुसार तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहायक,मार्फत पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला आहे.त्यानुसार अकोट तालुक्यातील अकोलखेड व पणज मंडळ सोडून सर्व मंडळातील शेतकऱ्यांना मदतही मिळाली.त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हसभाग नोंदवुन आंदोलनाला पाठिंबा दर्शवीला. या आंदोलनावेळी प्रहार पक्षाचे सुशील फुंडकर शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कवटकर यांच्यासह अकोलखेड व पनज मंडळातील बहुसंख्य शेतकरी आंदोलन मध्ये उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button