Akola news:शेतकरी नेते व ख्यातनाम संपादक प्रकाश पोहरे यांचे आस्की किड्स च्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन..
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट शहरातील अग्रणी शाळा म्हणून सर्वश्रुत असलेल्या आस्की किड्स पब्लीक स्कूल, पोपटखेड रोड अकोट येथे शनिवार रोजी संपन्न झालेल्या शाळा-पालक परिसंवादात अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व श्री प्रकाश पोहरे यांनी मार्गदर्शन केले. स्काऊट इंस्ट्रक्टर अरुणा काळे यांच्या मार्गदर्शनात वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक स्काऊट व गाईड परेड ने पाहुण्यांचे स्वागत केले व संगीत शिक्षिका रजनी भवाने यांच्या विद्यार्थी संगीत संचाने कर्णमधुर महाराष्ट्र राज्यगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक, शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते व प्रखर विचारवंत प्रकाश पोहरे यांनी “सक्सेस मंत्रा” या मथळ्याखाली शाळेकडून चालवल्या जात असलेल्या या अभ्यासेतर कार्यक्रमात सहभागी होऊन वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थी तथा पालकांना मार्गदर्शन केले. आज कृषी उत्पादनांमध्ये जनुकीय बदल घडऊन उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करणे शक्य झाले असले तरी त्याचा नवीन पिढ्यांच्या आरोग्यावर होत असलेला विपरीत परिणाम येत्या काळात चिंतेची बाब असणार आहे. असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संवादातून व्यक्त केले. कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याला मजबुती देण्याकरिता नवीन पिढ्यांनी काही अपायकारक बदलांना आळा घालून पारंपरिक शेतीला, अद्ययावत तंत्राचा संतुलीत वापर करुन नवीन दिशा देण्याची आज गरज आहे. आपल्या दैनंदिन गरजांमध्ये प्रमुख असलेल्या भाजीपाला, दूध ई. वस्तूंच्या शुद्धतेची खात्री करूनच प्रत्येक महिला पालकाने ते खाद्य पदार्थ मुलांना तसेच इतर कुटुंबीयांना खाऊ घालावेत असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थी शारिरीक व मानसिक दृष्ट्या अधिक सुदृढ घडवा यासाठी खाद्य भेसळ वेळीच ओळखून योग्य त्या उपाययोजना अमलात आणा असा मोलाचा सल्ला त्यांनी यानिमित्ताने दिला.”सक्सेस मंत्रा” हा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करित असलेल्या गणमान्य व्यक्तींना शाळेत आमंत्रित करुन विद्यार्थ्याना त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद झाडे यांच्या संकल्पनेतून व सचिव नितीन झाडे यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जात असलेल्या या कार्यक्रमात यापूर्वी अलोक खंडेलवाल अकोला, IPS सूरज गुंजाळ अशा अनेक यशस्वी व समाजोपयोगी व्यक्तींनी यापूर्वी सहभाग घेतला आहे.या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रकाश पोहरे साहेब, अतिथी म्हणून देशोन्नती तालुका प्रतिनिधी रामदास काळे, अध्यक्ष मिलिंद झाडे, सचिव नितीन झाडे उपस्थीत होते. मुख्याध्यापिका नेहा झाडे, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका संगीता बाळापूरे, सुषमा झाडे, पर्याव्येक्षक पवन चितोडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक शिक्षक मनीष सरकटे व वैशाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली मानकर तर आभार वृषाली देशमुख यांनी व्यक्त केले.