Akola news:फ्रीडम शाळेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आकोट :- स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूल , आकोट येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात ” हॉकीचे जादूगार” मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला कुंकुम तिलक हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे, प्रमुख पाहुणे म्हणुन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा टाले,पर्यवेक्षक विजय रेवस्कार, राखी वांगे, वर्षा हेंडजकर, पूजा बेराड,निशा हाडोळे, निखिल अनोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष तथा सर्व पाहुण्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून क्रीडा दिनाचे महत्व सांगितले तसेच क्रीडा शिक्षक विक्रांत चंदनशिव सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अरुणा ताले, संचालन सहाय्यक शिक्षिका रेखा अकोटकर व यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा डाबेराव केले . कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .
दै. ———————————– —————————–
आकोट सही दि. 29/08/2023